Kokan: पक्ष वेगळे असले तरी समाज म्हणून आपण एकत्र असले पाहिजे – केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले

0
77
Ramdas Athawale
पक्ष वेगळे असले तरी समाज म्हणून आपण एकत्र असले पाहिजे

महाड -तरुणांच्या मनात क्रांतीची ज्योत पेटविणारे शहीद भाई संगारे यांचे महाड मध्ये स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करूया . ज्यांच्या शब्दाशब्दांत असायचे अंगारे, ते होते भाई संगारे अशी काव्यमय सुरुवात करून तरुणांच्या मानत क्रांती ची ज्योत पटविणारे शहीद भाई संगारे यांच्या स्मृती प्रित्यर्थ महाड क्रंतीभुमीत त्यांचे स्मारक उभारण्यासाठी आपण सर्व जण प्रयत्न करुया; शहीद भाई संगारे यांच्या 25 व्या स्मृतिदिनी आज सर्व जुने पँथर एकत्र आले आहेत. आपले आता पक्ष वेगवेगळे असले तरी समाज म्हणून आपण नेहमी एकत्र असले पाहिजे अशी सामाजिक ऐक्याची साद घालत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिवंगत शहीद भाई संगारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. https://sindhudurgsamachar.in/kokan-विकासकामांच्या-मुद्दया/

भायखळा येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृह येथे दिवंगत शहीद भाई संगारे यांच्या 25 व्या स्मृतिदिनी आयोजित जाहीर श्रद्धांजली सभेत ना. रामदास आठवले बोलत होते.यावेळी विचारमंचावर सर्व दलित पँथर चळवळीतील जुने नेते उपस्थित होते.यावेळी विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सुद्धा उपस्थित होते त्यांनी दिवंगत शहीद भाई संगारे यांना श्रद्धांजली वाहणारे भाषण सभेच्या प्रारंभीच केले. यावेळी ज्येष्ठ पँथर नेते तानसेन ननावरे यांनी दिवंगत शहीद भाई संगारे यांचे क्रांति भूमी महाड येथे स्मारक करावे अशी मागणी केली. यावेळी सर्वच वक्त्यांनी या मागणीला पाठिंबा दिला.

यावेळी सभागृहात अनेक आंबेडकरी चळवळीतील पँथर कार्यकर्ते उपस्थित होते. दलित पँथर आणि नंतर भारतीय दलित पँथर च्या चळवळीतील अनेक आठवणींना उजाळा देत शहीद भाई संगारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी सभागृह दलित पँथर चळवळीच्या आठवणींनी पँथरमय झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here